Flower

शाखेतील उपलब्ध सोयी सुविधांचा तपशील

बार्शी शहराचा झपाटयाने होत असलेला विस्तार व सुमारे एक लाखावरील लोकसंख्या व त्या प्रमाणात शहराच्या अविकसीत व आर्थिक दुर्बल घटकांमधील विदयार्थ्यांच्या शॅक्षणिक अडचणी लक्षात घेता सन १९८२ साली संस्था अध्यक्ष मा. अर्जूनराव बारबोले यांनी सदर संस्थेची स्थापना केली. सध्या संस्थेमार्फत शहरातील विविध भागात नर्सरी, पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उ्च्चमाध्यमिक, चित्रकला महाविद्यालय, ऑद्योगिक प्रशिक्षण केंद्र, इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. संस्थेचे संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्यभर असून भविष्यात जास्तीत जास्त शॅक्षणिक व व्यवसायिक प्रशिक्षणाची सुविधा गरजू विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे. सध्या संस्थेच्या विविध शाखांचा अहवाल खालील प्रमाणे आहेतः

१) अभिनव पूर्व प्राथमिक विद्यामंदिरः
संस्थेमार्फत सुरु असलेल्या विविध भागांमधील ४ पूर्व प्राथमिक वर्गांमधून सुमारे २५० बालके शिक्षण घेत असून तेथे गरिब व मागासवर्गीयांना मोफत शिक्षण, शालेय सहित्य इ. सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

संस्थेने पूर्व प्राथमिक वर्गाबरोबरच येथील गरीब व आर्थिक, दुर्बल घटकांमध्ये शिक्षण घेउ इच्छिणार्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्राथमिक शाळा सुरू करून शिक्षणाची सोय उपलब्ध केली आहे येथील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण व शॅक्षणिक साहित्याचे वटप करण्यात येते. त्या प्रमाणे नगरपालिका शिक्षणमडळाचे माध्यमातून प्रॉढांसाठी साक्षरतेचे वर्ग चालविले जातत. प्रशालेचे निकाल प्रतिवर्षी १०० टक्के असून शिक्षक वर्ग प्रशिक्षीत व मान्यताप्राप्त आहेत.

२)अभिनव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयः
संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सुमरे ५५० विद्यार्थी/विद्यार्थींनी शिक्षणाचा लाभ घेत असून तेथील आर्थिक दुर्बल घटक व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण दिले जाते. त्याबरोबर विद्यार्थी दत्तक पालक योजना, पालक/शिक्षक मेळावा, समाजकार्य, एम.सी.सी. इ. योजना यशस्वीपणे राबविल्या जातात. प्रशालेचा निकाल उत्कृष्ट आहे. क्रिडा प्रकारामध्ये प्रशालेनी उत्कृष्ट परंपरा राखली असून खो-खो, कबड़ी, कुस्ती इ. क्रिडा प्रकारामध्ये मुले/मुली यशस्वी ठरल्या आहेत.

३) दिलीप शारीरिक शिक्षण महाविद्यालयः
शिक्षणाबरोबर खेलाची निकस लक्षात घेता व बार्शी शहरामध्ये असलेले एकमेव शारीरिक शिक्षण महाविद्यालय त्यामधील मर्यादित प्रवेश संख्या व या पदविकरीता बार्शी तालुका व मराठवाडा जिल्ह्यातील प्रवेशोच्छुक विद्यार्थी यांना प्रवेशाची अडचणी याबाबी लक्षात घेता संस्थेने १९९३ साली शारीरिक शिक्षण महाविद्यालयाची स्थापना केली.

सदर महाविद्यालातून प्रतिवर्षी १५० विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून गरीब/खेळाडू मागासवर्गीयांना अल्प फी मध्ये प्रवेश दिला जातो. दरवर्षी महाविद्यालयातील खेळाडू विभागीय / विद्यापीठ / आंतर विद्यापीठ स्पर्धेतील क्रिडा प्रकारात भाग घेतात. तसेच महाविद्यालयाने सन १९९५ सालचे विभागीय स्पर्धेचे आयोजन केले होते.

४) सोजर इंग्लश मिडिअम स्कूलः
सध्याच्या विज्ञान व संगणक युगात प्रगत इंग्रजी ज्ञानाची आवश्यकता व शासनाने इंग्रजी भाशा विषयक धोरणानुसार इंग्रजी *नाची आवश्यकता तसेच शहर व परिसरातील पालकाची आपल्या पाल्यांना इंग्रजी शिक्षण देणेची इच्छा व गरीब ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांची सोय उपलब्ध होणे करीता संस्थेने एक इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. सर्वसामान्यांना परवडेल अशा अल्प फी मध्ये इंग्रजी शिक्षणाची सोय उपलब्ध करण्यात आली असून सुमारे २५० विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. सर्व धर्मीयांचे सण येथे एकत्रितरित्या साजरा करण्यात येऊन राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाते.

५) सोजर चित्रकला महाविद्यालयः
आजच्या स्पर्धेतील युगामध्ये युवकांनी नोकरीच्या मागे न धावता त्यांच्या कला गुणांना वाव मिळुन त्यांना रोजगार अथवा स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होण्याकरिता संस्थेने चित्रकला महाविद्यालय सुरू केले आहे. गरीब व होतकरू विद्यार्थांना परवडेल अशा फी मध्ये प्रशिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे.फॉडिशन व एटीडी प्रथम व द्वितीय वर्ग महाविद्यालयाच्या प्रशस्त इमारतीत सुरू असून सुमारे ५२ विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. येथील प्रशिक्षीत कर्मचारी वर्गाच्या अथक परिश्रमामुळे नव्यानेच सुरू केलेल्या य महाविद्यालयाने अल्पकाळात यशोशिखर संपादन केले आहे.

६) सोजार ऑद्योगिक प्रशिक्षण केंद्र खाडवीः
संस्थेने बार्शी शहरापासून जवळ उपळाई स्टेशन(खंडवी) सारख्या ग्रामीण भागामध्ये गतवर्षीपासून ऑद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. सध्या तेथे वेल्डर(संधाता) व मोटार मेकानिक हे अभ्यासक्रम संस्थेच्या प्रशस्त इमारतीत सुरू असुन एकुण २५ विद्यार्थी प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत.

सध्याच्या संगणकीय युगात संगणकाचे प्रशिक्षण अत्यावश्यक बनले असून गरजू होतकरू सुशिक्षीत युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, व्यवसायाची संधी उपलब्ध होणेसाठी संगणकीय विभाग सुरू केला असून संस्थेने तेथे अल्प फी मध्ये प्रशिक्षणाची सोय केली असून सध्या ४ संगणक, १ छ्पाई यंत्र व इतर सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध केले आहे.

७) सोजर काँलेज आँफ फार्मसीः
संस्थेने औषध निर्माण शास्त्र शाखेची २००६ साली स्थापना केली. सध्या तेथे एकूण १२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच त्यांची निवासाचीही सोय करण्यात आली आहे तसेच शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. तसेच संस्थेने भव्य व सुसज्य इमारत उपलब्ध केली आहे.

८) सोजर कला व वाणिज्य महाविद्यालयः
संस्थेने बार्शी येथील माडेगांव रोड, ४२२ ए, या ठिकाणच्या गरीब, होतकरु गरजुवंत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सन २००१ पासुन शिवाजी विद्यापीठ संचलीत सोजर कला, वाणिज्य महाविद्यालय सुरु करणेत आलेले आहे. या काँलेजमध्ये २५० विद्यार्थी शिक्षण घेत असुन प्रतिवर्षी निकालाची परंपरा चांगली राखली आहे. सोलापूर विद्यापीठाच्या मध्यवर्ती युवा महोत्सवात काँलेजचे विद्यार्थी प्रथम क्रमांकाने आलेले असुन सर्वच क्षेत्रात काँलेजने आपली वाटचाल यशस्वी केलेली आहे.

संस्थेच्या सर्व शाखांमधील शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता चांगला असुन भविष्यात महाविद्यालय, महिलांसाठी शैक्षणिक सुविधा, वैद्यकीय विद्यालय, अभियांत्रीकी विद्यालय, अद्यावत क्रिडा संकुल इ. सुविधा उपलब्ध करण्याचा संथेचा मानस आहे.

९) सोजर प्राथमिक विद्यामंदिर संलग्न अपंग एकात्मिक शिक्षण योजना अंतर्गत इंटिग्रेशन युनिटः
या इंटिग्रेशन युनिटची स्थापना २००१ साली परांडा रोड, बार्शी येथे करण्यात आली. सदर इंटिग्रेशन युनिटमध्ये एकू्ण मतिमंदांचे ४, मुकबधिर मुलांचे ३ व अंध मुलांचे एक युनीट कार्यरत आहे. या सर्व युनिटमध्ये एकूण ६४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या युनिटमध्ये रिसोर्स रुमची सुविधा उपलब्ध आहे. आणि सर्व युनिटमध्ये प्रशिक्षीत शिक्षक कार्यरत असुन सदर शिक्षकांनी आरसीआय कडे नोंदणी केलेली आहे.